आमच्याविषयी

“परिसरातील प्रत्येक मूल शाळेत आले पाहिजे, आनंदाने शिकले पाहिजे आणि या शिक्षणातून समृद्ध जीवन जगण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे” हा विचार मनात ठेवून या शैक्षणिक संकुलाची स्थापना झाली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाचा हक्क नाकारला जावू नये हा विचार घेवून सुरु झालेली ही शैक्षणिक चळवळ आहे. विविध धर्म, पंथ, भाषा अनुसरणारी मुले इथे शिकतात आणि त्या सर्वांच्याच संस्कृतीचा, भाषेचा आदर इथे केला जातो.

अधिक माहिती

 

मुलांना विचार कसा करावा हे शिकवले पाहिजे!

काय विचार करावा हे नाही!

– मार्गारेट मीड

सृजन प्राथमिक विद्यालय

(अमराठी मुलांचे मराठीतून शिक्षण)

सृजन प्राथमिक विद्यालय” ही आमची स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळा आणि त्याला जोडून असणारे माध्यमिक विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे. अलिबाग जवळ साधारण अडीच – तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘कुरूळ’  गावात आमची शाळा आहे. अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेच, तसंच गेल्या १०-१२ वर्षांपासून बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीनेही अलिबागची झपाट्याने वाढ होते आहे. बांधकाम व्यवसायाशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करणारे कारागीर महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या अनेक भागातून अलिबाग आणि परिसरात स्थलांतरित होत आहेत.

कुरूळ गावातही अशा कुटुंबांची संख्या मोठी आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक या भागातून येणाऱ्या कुटुंबांची संख्या फार मोठी आहे. त्या कुटुंबामधली बरीच मुलंमुली आमच्या शाळेत येतात. आमच्या शिक्षिका या मुलांशी हिंदीत संवाद साधतात. या मुलांना स्वभाषेत, त्यांच्या घरच्या संवादभाषेत बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. सवयीने आमच्या शिक्षिकांना थोडी थोडी भोजपुरी समजते.

उपक्रम

कार्यक्रम

YouTube व्हिडिओ

फोटो गॅलरी

ब्लॉग